राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन

41

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजता त्यांचे निधन झाले आहे. ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या २० दिवसांपासून तरूण सागर काविळीने त्रस्त होते. कावीळेमुळे तरूण सागर यांना अशक्तपणा आला होता. पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. तरूण सागर महाराज यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त जमण्यास सुरूवात झाली आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.