राष्ट्रवादी लेबल लावून पूरग्रस्तांना मदत करत आहे; नाना पटोलेंची टीका

130

सांगली,  दि.१३ (पीसीबी) – पूरग्रस्तांना मदत करताना आम्हाला फोटो,  प्रसिद्धी काही नको आहे. मुस्लिम समाजाने  ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत  केली.  त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी  पूरग्रस्तांना लेबल लावून मदत  करत आहे. पण ते काय उपकार करत नाहीत. परंतु, उपकार करत असल्याप्रमाणे भासवत आहेत, असा टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला.

सांगली येथे नाना  पटोले  पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पटोले यांनी पत्रकारांनी  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पूरग्रस्तांना मदत केली . अद्याप  काँग्रेसने का केली नाही?  असा प्रश्न केला. यावर पटोले यांनी उत्तर दिले.

हवामान खात्याने अतिवृष्टीची  सूचना देऊनही  राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने  दुर्लक्ष केले.  मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकाला दोष देत आहेत. या दोघांविरूद्ध ३२०चे गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार  आहे, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.