राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

80

पुणे, दि. २७ (पीसीबी) – सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. मानकरांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुसाईडनोटमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे मानकरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यामुळे आता दीपक मानकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील विविध खंडपीठांनी नकार दिला होता.