राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांचा जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश

576

पुणे, दि. २३ (पीसीबी) – जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकरांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून जामिन मिळण्यासाठी मानकर यांनी सर्वोच न्यायालयाकडे जामिन अर्ज केला होता. मात्र सर्वोच न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून दहा दिवसांच्या आत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत.

या आदि देखील मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिन अर्ज सादर केला होता. मात्र बऱ्याच खंडपीठांनी त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. यामुळे मानकर यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून दहा दिवसांच्या आत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकरांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.