राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

85

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष युसूफ भाई कुरेशी यांच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक विभागाच्या नवीन पदाधिकाऱ्यांंच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर (जि.) राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग सरचिटणीसपदी पदी अशपाक शेख यांची नियुक्ती करण्यात आली. कमरुन्निसा शेख यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अॅड. नसीबुन्निसा खान यांची उपाध्यक्षापदी नियुक्ती केली आहे.

तसेच या महत्वाच्या प्रसंगी नगरसेविका फेहमिदा आपा जावेद शेख, हाजी अकबर मुल्ला सर, मुश्ताक शेख अध्यक्ष जमात ई लतीफिया मस्जिद, नासिर भाई शेख, हबीब शेख उद्योगपती, शाहजी अत्तार पटेल उघोगपती, रमजान अत्तार आदी उपस्थित होते. या संस्मरणीय प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकार्या ना शुभेच्छा

WhatsAppShare