राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवडमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

115

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात अभिवादन सभा घेण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. आमदार जयदेव गायकवाड, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, अरूण बोऱ्हाडे, निलेश पांढारकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपक साकोरे, शिला भोंडवे, शशिकांत निकाळजे, प्रशांत कडलग, संदिपान झोंबाडे, यतिन पारेख प्रमोद साळवी, रामदास मोरे, साऊल शेख, शशिकांत घुले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, संजय तुपे, सुर्यकांत पात्रे, शिवदास चिलवंत, समाधान मारकड, आकाश अंकुटे, योगेश आयवळे, गणेश‍ शिंदे, अभिजीत गोपी, अभिजीत आल्हाट, शिवाजी सुरवसे, राजेंद्र शिंदे, हनुमंत प्रधान, धर्मा शिंदे, केरबा पात्रे, मारूती पात्रे, अमित गायकवाड, प्रविण बनसोडे, ऋषीकेश सोनवणे, बुध्दकोष निकाळजे, राम तुपे यांनी परिश्रम घेतले.