राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना मातृशोक

670

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांच्या मातोश्री मंदाकिनी कृष्णराव शितोळे (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी (दि. २) सकाळी निधन झाले.

त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (गुरूवार) दुपारी दोन वाजता सांगवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.