राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरीतून शहराध्यक्ष पदासाठी विलास लांडे यांच नाव चर्चेत

378

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी  निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच तयारी सरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी – चिंचवड शहराकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदात बदल होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकेता नुसार भोसरीतून माजी आमदार विलास लांडे यांना शहराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवड शहराकडे लक्ष वेधले आहे. शरद पवार यांनी तयारीला सरूवात केली आहे. भाजपचे शहराध्यक्षपद आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक लक्षात घेत राष्ट्रवादीने आता शहराध्यक्षपद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीतून माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाच्या नावाची चर्चा रंगत  आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने कामाला जोरदार सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्यात लढाई झाली. मात्र महेश लांडगे यांनी विजय मिळवला. म्हणून महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून पुन्हा विलास लांडे आणि महेशदादा लांडगे यांच्यात लढाई होणार.

 

WhatsAppShare