राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजेंनीही पवारांची साथ सोडली!

121

मुंबई , दि.१३ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला आणि पवारांना मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते १४ तारखेला भाजपात प्रवेश करणार आहेत.

उदयनराजेंनी स्वत: याबद्दल फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. तसंच आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील, असंही म्हटलं आहे.

भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबरला उदयनराजे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचंही कळतंय.