राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार

184

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेनेला जय महाराष्ट्र करत  पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादीतून उमेदवारी घेणारे अमित घोडा यांचा दोन दिवसांमध्ये पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  घोडा आज (सोमवार) आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची   शक्यता आहे.

पालघर मधील  शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेने संधी नाकारल्यामुळे घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बंडखोरी करत त्यांनी महाआघाडीकडून उमेदवारी अर्जही भरला होता.

पण अमित घोडा यांच्याशी संपर्क साधून  ठाण्यातील शिवसेनेचे  नेते व मंत्री एकनाथ शिंदे  आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केली. त्यानंतर, घोडा हे आज माघार घेण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील असे शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनी सांगितले.

WhatsAppShare