राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्याकडून राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका  

211

पुणे, दि. ११ (पीसीबी) – मुंबईत दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला अध्यक्षा  रुपाली चाकणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली आहे. यामुळे राम कदम यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महिलांबाबत असंविधानिक विधान करुन  महिलांचा अपमान केल्याबद्दल राम कदमांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी याचिकेतून केली आहे. येत्या २१ सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले आहे.  ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. यावर आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे राम कदम म्हणाले  होते.