राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून पुर्ववैमनस्यातून; एक जण ताब्यात

256

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा पुतण्या राजेंद्र खेडकर याचा खून पुर्वी झालेल्या वादातून केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी बाराच्या सुमारास देहू फाटा येथे उघडकीस आली. या प्रकरणी दिघी पोलिसांनी मकरकळ येथून एकाला ताब्यात घेतले आहे.

प्रवीण उर्फ पप्पू दगडू कदम असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राजेंद्र दिगंबर खेडकर (वय ३०, रा. चऱ्होली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. माजी नगरसेवक  घनशाम खेडकर यांचा तो पुतण्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेंद्र आणि आरोपी कदम या दोघांमध्ये पुर्वी भांडण झाले होते. सोमवारी रात्री ते दोघे दारूपित बसले होते. दारू पित असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. चिडलेल्या कदमने शेजारीच पडलेल्या लोखंडी हातोड्याने खेडकर याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलिस तपास करत आहेत.