राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरला आहे- सुजय विखे पाटील

148

नगर, दि. ११ (पीसीबी) – राज्यातील एक पीढी उद्ध्वस्त करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरला आहे. ईडी आणि सीबीआय दबाव आणून आमदारांना पक्ष सोडायला भाग पाडत असल्याचा कांगावा राष्ट्रवादीने सुरू केला आहे, असे म्हणत भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. नगर लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील साडे आठ कोटींच्या विकासकामांचे भूमिपुजन आणि उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत विखे कुटुंबीयांना संपविण्याचे विरोधकांचे षडयंत्र होते, असा आरोप सुजय विखेंनी केली आहे. यावेळी बोलताना सुजय विखेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडल काँग्रेस-राष्ट्रवादीवर आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली, असा टोला देखील सुजय विखेंनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान, निवडणुकीला उभारण्यासाठी विरोधकांचे उमेदवार घाबरत असून पक्षातील प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवत आहे, असेही सुजय विखेंनी सांगितले. यामुळे विखे परिवार आणि पवार परिवारांमधील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.