राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल

139

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिखली, तळवडेभागासह शहरात ठिक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात विना परवाना जमाव जमवून घोषणाबाजी केली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.