राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल

3165

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिखली, तळवडेभागासह शहरात ठिक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात विना परवाना जमाव जमवून घोषणाबाजी केली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे, समीर मासुळकर, जावेद शेख, मोरेस्वर भोंडवे, नगरसेविका वैशाली काळभोर, गीता मंचरकर, सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे, अपर्णा डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली, तळवडेभागासह शहरात ठिक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होते. त्यामुळे काल (शुक्रवारी) महापालिकेतील सहशहर अभियंता आयुभ पठाणा यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विना परवाना एकत्र येऊन घोषणाबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.