राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांच्या पुतण्याचा खून

298

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्यावर अनोळखी टोळक्याने हल्ला करून खून केला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी बाराच्या सुमारास देहू फाटा येथे उघडकीस आला. मात्र खूनाचे कारण अद्याप कळालेले नाही.

राजेंद्र दिगंबर खेडकर (वय ३०, रा. चऱ्होली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. माजी नगरसेवक  घनशाम खेडकर यांचा तो पुतण्यात आहे.

आज (मंगळवारी) सकाळी बाराच्या सुमारास देहू फाटा येथे मृतदेह राजेंद्र याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर जखणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे माजी नगरसेवकाच्या पुतण्यावर अनोळखी टोळक्याने हल्ला करून खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.