राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

230

चाकण, दि. ६ (पीसीबी) – स्वीकृत नगरसेवकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वीकृत नगरसेवकाचे मार्केट यार्ड येथे दुकान आहे. त्या दुकानात मोहिते पाटील बुधवारी पात्री ८ वाजता गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या नगरसेवकाच्या पत्नीला तुझा पती कुठे आहे. त्यांने दहा हत्या केलेल्या आहेत. त्याला सांभाळून राहायला सांगा, अशी दमबाजी आणि शिवीगाळ केली. तसेच नगरसेवकाच्या पत्नीच्या हाताला धरून खेचले, तसेच लज्जास्पद स्पर्शही केला, असा आरोप करण्यात आला आहे.

गुरूवारी (दि. ५) सायंकाळी सहा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बुधवार आणि गुरूवार मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचे पती नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन नरवडे या मोहिते -पाटलांच्या आणि एकेकाळी त्या स्वीकृत नगरसेवकाचा व्यवसायातील जोडीदार याने ही अपहरणाची तक्रार दिली आहे.