राष्ट्रवादीचे पिंपरी महापालिकेत आत्मप्रौढीसाठी नाटकी आंदोलन; पक्षासाठी महिलांपेक्षा विरोधी पक्षनेत्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा

101

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – दहीहंडी उत्सवाच्या वेळी आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही देणे-घेणे नसल्याचे गुरूवारी (दि. ६) स्पष्ट झाले. महिलांच्या सन्मानापेक्षा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अज्ञानाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेले विधान राष्ट्रवादीला महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी आयुक्तांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राष्ट्रवादीने आत्मप्रौढीसाठी केलेल्या या नौटंकी आंदोलनाचा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी सभागृहातच बुरखा फाडला.