राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकरांवर मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश

708

पुणे, दि. १ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने तसेच सर्वोच न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळून पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितल्याने. आज (बुधवार) सकाळी मानकर हे लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर झाले होते. पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले. तसेच त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जितेंद्र जगताप यांनी एका भुखंड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडून आपला मानसिक छळ होत असल्याची सुसाईड नोट लिहून २ जून २०१८ रोजी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर मानकरांसह अन्य पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरुवातीला लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, मानकरांव्यतिरिक्त यापूर्वी विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.