राष्ट्रवादीची शनिवारी मुंबईत चिंतन बैठक; शरद पवार घेणार आढावा

61

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – शनिवारी एक जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात या वर्षीच होणाऱ्या विधानसभेच्या रणनितीवरही चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता पक्षाची जनरल बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकसभा आणि आगामी विधानसभा याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.