राष्ट्रवादीकडून जागा वाटपाचा कोणतीही प्रस्ताव आलेला नाही – अशोक चव्हाण

92

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५० टक्के जागा लढवण्याचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिलेला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना जागा वाटपासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर चव्हाण यांनी खुलासा केला आहे.   

शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत पवारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ५०-५० टक्के जागावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राहुल गांधींसमोर ठेवला होता, असे सांगितले जात होते.

दरम्यान पवार यांनी सोमवारी (दि.२७) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते म्हणाले की, भाजपसोबत नसणाऱ्या सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.