राष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे? – प्रा.योगेश सोमन

101

चंद्रपूर,दि.२३(पीसीबी) – भारतीय सद्विचार प्रसारक मंडळ व नगर रा.स्व.संघ, चंद्रपूरच्या वतीने माधवराव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शिनी सभागृहात प्रा. सोमन यांनी सावरकर यांच्यावर एकपात्री प्रयोग तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान सादर करण्यात आले होते. यावेळी प्रखर राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर कसे, असा प्रश्न उपस्थित करित अभिनेते प्रा.योगेश सोमन यांनी एकपात्री अभिनयातून सावरकरांचा संपूर्ण जीवनपट रसिकश्रोत्यांसमोर सादर केला.

पहिल्या दिवशी प्रा.सोमन यांनी रसिकमनाचा वेध घेत सावरकर यांचे बालपण, त्यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, स्वातंत्र्य लढय़ातील योगदान, त्यांनी भोगलेली अंदमानची काळय़ापाण्याची शिक्षा असा संघर्षमय प्रवास मांडला. तसेच सावरकरांचे साहित्य, मातृभूमीला उद्देशू सागरा प्राण तळमळला हे काव्य अभिनयाद्वारे जिवंतपणे मांडले.

दरम्यान, प्रा. सोमन यांनी सावरकरांच्या अंगी प्रखर राष्ट्रवाद कसा ठासून भरला होता याची माहिती दिली. असा प्रखर राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवणारा स्वातंत्र्यवीर माफीवीर कसा असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.