राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी

371

केरळ, दि. ६ (पीसीबी) – दारुच्या नशेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने केरळच्या त्रिशूर पोलिसांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्रिशूरच्या मंदिरात पुजारी असलेल्या जयारमन याने पोलिस कंट्रोल रुमला कॉल केला. तसेच राष्ट्रपतींची हत्या केली जाईल असे सांगितले.

धमकी मिळताच पोलिसांनी कॉल ट्रेस केले आणि आरोपीला अटक केली. त्रिशूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी जयारमनने हे सर्वच दारुच्या नशेत केले आहे. पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर सकाळी त्याची नशा उतरली. तेव्हा आपल्याला काहीच आठवत नाही असे तो म्हणत होता. विशेष म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी (दि.७ ऑगस्ट) त्रिशूरच्या गुरुवायूर मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे, आरोपीला तूर्तास ताब्यातच ठेवण्यात आले आहे.