राष्ट्रपतींतर्फे राकेश सिन्हा, सोनल मानसिंह यांच्यासह चौघांची राज्यसभेवर नियुक्ती

12

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे. सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून एकाही प्रसिद्ध चेहऱ्याला संधी मिळालेली नाही ही बाब महत्त्वाची आहे. कारण अभिनेत्री रेखा आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजरीवरून बरीच टीका आणि चर्चा झाली होती. त्यामुळे सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही असे समजते.