रावेत येथे स्कुल बस, इनोव्हाचा भीषण अपघात;  एक जण जखमी

1067

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – औंध – रावेत बीआरटी मार्गावर रावेत बास्केट ब्रिज जवळ स्कुल बस आणि इनोव्हा यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. हा अपघात आज (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी शाळेची बस डांगे चौकातून रावेतच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, इनोव्हा मोटार आणि बसचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा मोटाऱ बीआरटीच्या सुरक्षा कठड्याला जाऊन अडकली. यामध्ये इनोव्हामधील एकजण जखमी झाला आहे. मात्र, सुदैवाने स्कुलबसमधील कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.