रावण साम्राज्य टोळीतील गुंडाला पिस्तुलासह वाकड येथून अटक

236

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – रावण साम्राज्य टोळीतील गुंडाला एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली आहे.  ही कारवाई वाकड पोलिसांनी कस्पटे वस्ती येथे केली.

विक्रांत सुभाष कांबळे (वय २०, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हनुमांत बांगर यांना माहिती मिळाली होती की, एक तरुण कस्पटेवस्ती कडून हिंजवडीच्या दिशेने बुलेट वरून जात आहे. त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज येथे सापळा रचून विक्रांत याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले, पोलिसांनी ते जप्त करुन विक्रांतला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता तो देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असल्याचे समोर आले. वाकड पोलिस तपास करत आहेत.