रायगडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी

62

रायगड, दि. १० (पीसीबी) –  पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

हा अपघात आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास झाला.

प्राप्त माहितीनुसार, आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास महागाव – पेण बसला अपघात झाला. पेणमधील वरवणे येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नातच एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस रस्त्यावरुन उतरुन लगतच्या शेतात घुसली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस व एसटी प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.