राम मंदिर नक्कीच बनेल, कारण सर्वोच्च न्यायालय आमचे आहे – भाजप आमदार

113

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे. मात्र,   राम मंदिर नक्कीच बनेल, कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचे आहे, असे भाजप आमदार मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटले आहे.

मुकुट बिहारी वर्मा हे उत्तर प्रदेशच्या कैसरगंज येथून निवडून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम मंदिर वेळेवर बांधले जाईल, नियतीत जे असेल ते कोणीही टाळू शकत नाही, असे विधान केले होते. तर येथील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राम मंदिराचा मुद्दा जर चर्चेने सोडवला गेला नाही तर संसदेत कायदा बनवून राम मदिर उभारण्याच्या दिशेने पावले टाकू, असे म्हटले होते0.

तर आता राम मंदिर नक्कीच बनेल कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचे आहे. असे वर्मा यांनी म्हटले आहे.