“राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार”

61

अयोध्या,दि.२३(पीसीबी) – काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्याकडून राम मंदिरासाठी देणगी घेण्याचा मानस श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी व्यक्त केला. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी सर्वांचा हातभार लागावा, यासाठी विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यकर्ते काँग्रेससह सर्वपक्षीयांकडे जाणार आहेत.

केसर भवनातील विश्व हिंदू परिषदेच्या क्षेत्रीय कार्यालयात पत्रकारंशी बोलताना राय म्हणाले की 15 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या समर्पण अभियाना अंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील 5 लाखांपेक्षा अधिक गावं आणि जवळपास 12 कोटी 25 लाख घरांमध्ये जातील.

दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते काँग्रेस नेते राहुल गांधींकडेही मदत मागायला जाणार का, असा प्रश्न चंपत राय यांना विचारण्यात आला. आम्ही कार्यकर्त्यांना कोणतीही विशिष्ट मर्यादा घातलेली नाही. आम्ही सर्वांकडे जाणार आणि प्रत्येकाची वेळ घेऊन जाणार, असं राय म्हणाले.

WhatsAppShare