‘राम’ नव्हे ‘रावण’ , राम कदम यांच्यावर मनसेचा ‘पोस्टर वार’

156

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने बॅनरबाजी केली. घाटकोपरमध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेने बॅनर लावले. हे बॅनर पहाटे पोलिसांनी काढले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांना एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.