राम कदम दोषी आढळल्यास गृहखाते कारवाई करेल – विनोद तावडे

410

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – भाजप आमदार राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेले विधान चुकीचेच आहे. मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल,  असे विनोद तावडे यांनी आज (बुधवार) येथे सांगितले.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाचा  घेराव घालून जाब विचारला. यावेळी तावडे म्हणाले की,  प्रसार माध्यमांवर जी राम कदम यांची क्लिप दाखवली जाते, तसे विधान करणे चुकीचेच आहे. जर यामध्ये ते दोषी आढल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला. पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि विनोद तावडे यांना घेराव घालून याबाबत  खुलासा  मागितले. राज्यातील मखलाशी बंद करा व असल्या विकृतीला तातडीने हाकलून द्या’ अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  केली .