रामलीला मैदानाचे नांव बदलण्याऐवजी मोदींचे नांव बदला, तर मते मिळतील – अरविंद केजरीवाल  

92

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या ५ नगरसेवकांनी दिला आहे. या प्रस्तावावरुन राजकीय टीकाटिप्पणी होऊ लागली आहे.

यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला पंतप्रधान मोदींचेच नाव बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना आता मते मिळतील, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.