रामराजे नाईक-निंबाळकरांच्या जीविताला धोका; तक्रार आल्यास कारवाई – विश्वास नांगरे-पाटील

1015

सातारा, दि. ११ (पीसीबी) – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जीविताला धोका असल्याची पोलिसांकडे तक्रार आल्यास निश्‍चित कारवाई करू, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे स्पष्ट केले.  

काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी  माझ्या जीविताला धोका असल्याने मला दिल्लीला जावे लागेल, असे फलटणमधील एका कार्यक्रमात म्हटले होते. याबाबत  नांगरे- पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले की, हे सर्व आम्ही वृत्तपत्रातूनच वाचले आहे. याप्रकरणी   तक्रार आल्यास आम्ही निश्‍चित कारवाई करू, असे नांगरे-पाटील म्हणाले.

गणेशोत्सवादरम्यान,  डॉल्वी लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या वाहनांसह डॉल्वी जप्त करण्यात येणार आहे.   मंडळांनी नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे नांगरे-पाटील म्हणाले.