रामनगर येथील तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला अटक

634

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पुणे शहर आणि जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला एका सराईत आरोपी चिंचवड रामनगर परिसरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) दुपारी अडीचच्या सुमारास केली.

बाळु रोहिदास मोहिते (वय ३१, रा. राम मंदिराच्या मागे, रामनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्तांनी ११ जानेवारी रोजी बाळु याला १८ महिन्यांसाठी – पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून चिंचवड रामनगर येथील तडीपार करण्यात आलेला सराईत आरोपी बाळु हा राममंदिरासमोर उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानुसार तात्काळ धाव घेऊन बाळु याला अटक केली. बाळु याच्यावर तडीपारीची कारवाई केली असताना त्याने त्या आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४२ प्रमाणे कारवाई केली आहे. बाळू विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.