राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या ‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर लाँच

130

मुंबई, दि. १० (पीसीबी) – वेब सीरिजना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे यात दररोज वेगवेगळ्या विषयांची भर पडत आहे. मोठमोठे बॉलिवूड कलाकारसुद्धा डिजीटल प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवत आहेत. अशातच वेब सीरिजच्या विश्वात एक आश्चर्यकारक एण्ट्री झाली आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने एका वेब सीरिजची निर्मिती केली असून त्यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. ‘राह दे माँ’ असे या वेब सीरिजचे नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आता राधे माँ म्हटल्यावर ही वेब सीरिज धार्मिक किंवा आध्यात्मिक असेल असे अनेकांनी गृहित धरले असणार. पण तसे नसून एका वेगळ्यात मुद्द्यावर यात भाष्य केले गेले. ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृश्याने होत असून त्यात समलैंगिकतेचा मुद्दा मांडला आहे. राधे माँच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांवर ही वेब सीरिज आधारित आहे.