रात्रीच्या वेळी घराला कुलूप आहे असं दिसताच; चोरटयांनी साधला डाव

50

देहूरोड, दि. २६ (पीसीबी) – घराला कुलूप लावून राजस्थान येथील मूळगावी केलेल्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरातून 77 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 15 जुलै रोजी दुपारी पाच ते 23 जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शितळा नगर, मामुर्डी येथे घडली.

उमेश पूरणमल घोडेला (वय 43, रा. अष्टविनायक सोसायटी, रो हाऊस नंबर सात, शितळा नगर, मामुर्डी) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 15 जुलै रोजी त्यांच्या राजस्थान मधील मूळ गावी गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेले 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, तसेच 35 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare