राज यांचे उद्धव-पवारांना पत्र; ‘ईव्हीएम’ला विरोध करण्याचे आवाहन

79

मुंबई,  दि. २९ (पीसीबी) – आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ‘ईव्हीएम’ला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.