राज ठाकरे यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

69

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या  निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्या करण्याचा आज (बुधवारी) दुपारी १२ च्या सुमारास प्रयत्न केला. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केल्याच आरोप या शिक्षकाने केला आहे.

हा शिक्षक कला विषयाचा शिक्षक असून महाविद्यालय प्रशासन कला विभाग बंद करणार आहे   याविरोधात मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणतेही उत्तर आलेले नाही, असा आरोप या शिक्षकाने केला आहे.

राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करीत आहे, असे  या शिक्षकाने पत्रात लिहिले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांने द्रव पदार्थ प्राशन केल्याचे  त्याच्या भावाने सांगितले. त्याला उपचारासाठी हिंदुजा रूग्णालयात दाखल केले आहे.