राज ठाकरे यांचा पक्ष संपलेला; रामदास कदमांची टीका

42

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपलेला आहे. व्यापाऱ्याकडून सुपारी घेऊन त्यांनी शिवसेनेची बदनामी सुरू केली आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. राज ठाकरे नऊ महिने झापले होते काय? ते काळ्या मांजरासारखे प्लॅस्टिकबंदीच्या निर्णायाला आडवे येत आहेत. इंग्लंड सरकारकडून या निर्णयाला फॉलो केले जात आहे, असे रामदास कदम म्हणाले.

घाटकोपर येथील असल्फा विभागात शिवसेनेच्या वतीने कापडी पिशवी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रामदास कदम बोलत होते.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, राज ठाकरे चुकलेले आहेत. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत करायला हवे होते. संपूर्ण जगाने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. हा जागतिक निर्णय असून आपल्या देशाला याचे यजमानपद मिळाले आहे. १७ राज्यात प्लॅस्टिकबंदी असली तरी जागतिक निर्णय झाल्यानंतर सुरूवात महाराष्ट्राने केली आहे. संबंध जग नालायक आहे, आणि मी केवळ एकटा लायाक आहे, असे म्हणून चालणार नाही, असे रामदास कदम म्हणाले.