राज ठाकरेंच्या भेटीवर खासदार अमोल कोल्हे म्हणाले…

192

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी भाजपविरोधात  घेतलेल्या सभांचा परिणाम चांगला जाणवला. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर त्यांची भेट घेतली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांनी आज (बुधवार) येथे सांगितले.

ही भेट अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात  झाली.  त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  रंगू लागल्या  आहेत. परंतु या चर्चांना  कोल्हे यांनी पूर्णविराम  दिला आहे.

दरम्यान,  लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत कोल्हे यांनी शिरूरचा बालेकिल्ला ताब्यात घेतला होता.  शिवाजीराव आढळराव पाटील हे यापूर्वी तीनवेळा खासदार म्हणून निवडूनआले होते.  दरम्यान, कोल्हे यांनी त्यांचा सुमारे  ५८ हजार मतांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते.