राज्य सरकारच्या निषेधार्थ आकुर्डीत तहसील कार्यालयासमोर भाजपाचे धरणे आंदोलन

128

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – महाराष्ट्रातील जनतेंनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप भाजपाकडुन करण्यात आला आहे. त्याच्या निषेर्धात पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (दि.२५) रोजी आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सीमा सावळे, आशा धायगुडे, विलास मडिगेरी, एकनाथ पवार, उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, अमोल थोरात, बाबू नायर, शैला मोळक तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना-कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.