राज्य समन्वय समितीमध्ये विशाल विश्वास डोंगरे यांची समन्वयकपदी निवड

1

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – स्वराज्य कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण या संस्थेचे अध्यक्ष विशाल विश्वास डोंगरे यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी साठी यांच्या राज्य समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीमध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी एक या पद्धतीने निवड करण्यात आली आहे. पुणे महसूल विभागातून म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यामधून केवळ एक प्रतिनिधी म्हणून डोंगरे यांची निवड करण्यात आली. या समितीत कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था व शासन यांच्या मध्ये समन्वय साधने, प्रशिक्षण घेताना विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने शासनास शिफारस करणे तसेच शासनाच्या कौशल्य विकास धोरणामध्ये सहभाग, योगदान वाढविण्यासाठी व शासनास उपाय योजना सुचविण्याचे काम ही समिती करते.

विशाल विश्वास डोंगरे हे उच्च शिक्षित असून यापूर्वी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष चैतन्य प्रतिष्ठान पुणे म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक संस्थांचे व शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त आहेत. यापूर्वी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय उद्योजकता, विकास प्रशिक्षणचा अनुभव असून संस्थेमार्फत अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीपणे रोजगार व स्वयंरोजगार साठी मार्गदर्शन केले आहे. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाचे विभागीय उपायुक्त शरद आंगणे यांनी विशाल डोंगरे यांचे अभिनंदन केले.

WhatsAppShare