राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड

44

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. सर्वाधिक मते घेत सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस अध्यक्षपद पटकावले. वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे अमित झनक यांच्याकडे उपाध्यक्षपद असेल. शिवाय कुणार राऊत हे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.