राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

91

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी विजया रहाटकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली चाकणकर राज्यातील विविध विषयांवर बेधडक आणि सडेतोड उत्तर देताना दिसत असून विरोधकांना नेहमी सडेतोड उत्तर देत, एक स्पष्टवक्त्या बेधडक महिला नेत्या म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे पाहिले जात. रुपाली चाकणकर या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महिलांविषयीच्या अनेक विषयांवर भाष्य करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्याचा हुकूमी एक्का म्हणून देखील रुपाली चाकणकर यांच्याकडे पाहिले जात होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंड येथील आहे. एका शेतकरी कुटुंबात त्या लहानच्या मोठ्या झाल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून अनेक स्पर्धा परीक्षांसाठीचा त्यांचा अभ्यास आहे.

रुपाली चाकणकर या शेतकरी कुटंबातील असून त्यांना माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्यानंतर राजकारणात सक्रीय झाल्या. रुपाली चाकणकर यांच्या सासरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्या देखील राजकारणात उतरल्या. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत महिलांच्या प्रश्नांवर पक्षाची आणि आपली खंबीर बाजू वेळोवेळी मांडून सतत महिला हक्कासाठी त्या झगडताना दिसल्या.

WhatsAppShare