राज्यात १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणूक – चंद्रकांत पाटील

106

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ सप्टेंबरला लागू होईल. तर १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक होईल, असा अंदाज  पुण्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केला.

पिंपरीतील मोरवाडी येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे  भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होणार आहेत. त्यामळे युतीच्या विधानसभेत २२० जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही, असा विश्वास व्यक्त करून ‘अब की बार २२० पार’ या घोषणेचा पुनरूच्चार  पाटील यांनी यावेळी केला.