राज्यातील २७ महापौर पदाची सोडत; पिंपरी चिंचवड महानगरपालिका खुल्या गटातील महिलांसाठी राखीव

569

पिंपरी,दि.१३ (पीसीबी) – राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत काढण्यात आली आहे. २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात आज काढण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात आली.
अशी निघाली महापौर सोडत –

अनुसुचित जमाती – वसई विरार

अनुसूचित जाती – मीरा भाईंदर

अनुसूचित जाती ( महिला ) – अहमदनगर, परभणी

मागास प्रवर्ग ( महिला ) – नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव

मागास प्रवर्ग – लातूर, धुळे, अमरावती

खुला प्रवर्ग, महिला आरक्षित – नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड,जळगाव, भिवंडी,                                      अकोला, पनवेल,  औरंगाबाद, चंद्रपूर

, खुला प्रवर्ग, सर्वसाधारण – मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-                                     डोंबिवली, सांगली, उल्हासनगर

WhatsAppShare