राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

404

मुंबई, दि. १५ (पीसीबी) –  राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरुन डॉ. संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून, या पदावर आता संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे. डॉ. के. एच. गोविंदा राज यांची  कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. संजय मुखर्जी यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या सचिवपदी बदली झाली आहे.

अनुप कुमार यादव यांची कुटुंब कल्याण आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुकतपदी बदली झाली आहे. परिमल सिंह यांची विशेष विक्रीकर अधिकारी या पदी बदली झाली आहे. डॉ. एच. यशोद यांची महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
 
ई. रावेंदिरन यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली केली आहे. एम. जे. प्रदीप चंद्रन यांची सामान्य प्रशासन विभाग (माहिती आणि तंत्रज्ञान)
उपसचिव पदी बदली करण्यात आली आहे. डॉ. बी. एन. पाटील यांची पर्यावरण विभागाच्या संचालक पदी बदली झाली आहे. तर ए. बी. धुलाज यांची राज्य कर्मचारी विमा योजना, आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.