राज्यातील १०४१ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान

156

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १०४१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त पदांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे, तर २७ सप्टेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी आज (गुरूवार) येथे दिली.  

या ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.  ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान घेण्यात येणार आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.

नामनिर्देशनपत्रे  दि. ५ ते ११ या दरम्यान दाखल करावी लागणार आहेत. तर   छाननी १२ सप्टेंबररोजी रोजी करण्यात येईल. तर नामनिर्देशनपत्रे  १५ सप्टेंबर  पर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल.

ठाणे- ६, रायगड- १२१, रत्नागिरी- १९, सिंधुदुर्ग- ४, नाशिक- २४, धुळे- ८३, जळगाव- ६, अहमदगनर- ७०, नंदुरबार- ६६, पुणे- ५९, सोलापूर- ६१, सातारा- ४९, सांगली- ३, कोल्हापूर- १८, बीड- २, नांदेड- १३, उस्मानाबाद- ४, लातूर- ३, अकोला- ३, यवतमाळ- ३, बुलडाणा- ३, नागपूर- ३८१, वर्धा- १५, चंद्रपूर- १५, भंडारा- ५ आणि गडचिरोली- ५  एकूण- १०४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

ठाणे- ४, रायगड- ३, सिंधुदुर्ग- १, नाशिक- ८, धुळे- २, जळगाव- १, पुणे- ६, सातारा- ३, सांगली- १०, उस्मानाबाद- १, जालना- २, यवतमाळ- ३, वाशीम- ६, बुलडाणा- २, नागपूर- १, चंद्रपूर- २ आणि गडचिरोली- १४. एकूण ६९ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होणार आहे.