राज्यातील सत्तासंघर्षांवर उद्या होणार निर्णय

140

नवी दिल्ली,दि. २५(पीसीबी) – राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर आज पुन्हा या प्रकरणावर न्यायालयने सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी कोर्टात जवळपास २ तास यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून २४ तासात बहुमतचाचणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.

राज्यातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.

WhatsAppShare