राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील

271

बेंगळुरु, दि. ६ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, असा अत्यंत धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार बसनागौडा यत्नल यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बसनागौडा यत्नलचा हा खळबळजनक खुलासा होताच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी चौकशीची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप आमदाराने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेसने तातडीने चौकशीची मागणी केली आहे. मात्र, भाजप आमदाराने जुना किस्सा सांगताना खुलासा केला आहे. भाजप आमदार बसनागौडा यत्नल यांनी शुक्रवारी असा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. बसनागौडा यत्नलचा हा खळबळजनक खुलासा होताच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी चौकशीची मागणी केली.
‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भाजप आमदाराने सांगितले की, कर्नाटकातील सर्वोच्च पद मिळविण्यासाठी त्याच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करणारे एजंट होते. पक्षाच्या एका कार्यक्रमात बसनागौडा यत्नल म्हणाले की, राजकारणात एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला तिकीट देऊ, सोनिया गांधी किंवा जेपी नड्डा यांना भेटा, ते माझ्यासोबतही करतात, असे मला म्हंटले होते, असे प्रस्ताव देऊन येणाऱ्या चोरांवर विश्वास ठेवू नका. 2500 कोटी दिल्यावर मला मुख्यमंत्री केले जाईल.